Breaking

Monday, 30 August 2021

मुंबई/ अनिल देशमुखांना क्लिनचीट मिळाल्याच्या व्हायरल अहवालावर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया.


अनिल देशमुखांना क्लिनचीट मिळल्याचा व्हायरल अहवालावर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया; 
म्हणाले….......
 
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सी.बी.आय.) केलेल्या प्राथमिक चौकशीत राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना ‘क्लीनचिट’ देण्यात आली असल्याचा दावा करणारी कागदपत्रे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर  फिरत आहेत. 
१०० कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपातून त्यांना सी.बी.आय.कडून क्लिनचिट मिळाल्याची माहिती यात देण्यात आली आहे. 
दरम्यान, या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 
या प्रकरणी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केलं आहे. 
“देशामध्ये फेकन्यूज हे व्हायरस सारखे पसरत असल्याचे न्या. चंद्रचूड यांनी सांगितले आहे. 
सत्य समोर आणण्याची जनतेची, माध्यमांची आणि जे सत्तेत आहेत त्यांची जबाबदारी आहे. 
हा अहवाल खरा की खोटा हे सी.बी.आय.सोडून कुणीही सांगू शकत नाही. 
सी.बी.आय.ने याबाबतील खुलासा करायला हवा,” 
असे नवाब मलिक यांनी ए.बी.पी. माझासोबत बोलताना म्हटले आहे. 
“हा अहवाल मुद्दाम समोर आणला जात आहे का ?
असा प्रश्न विचारल्यावर नवाब मलिक यांनी यावर प्रतिक्रिया दिली. 
ही कागदपत्रे सी.बी.आय.च्या रेकॉर्डचा भाग आहे की नाही याचा खुलासा सी.बी.आय. करु शकते. 
जर खोटं असेल तर याची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई होऊ शकते. 
जर हे खरं असेल तर सी.बी.आय.ने हे सांगितलं पाहिजे,” 
असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 
सी.बी.आयच्.या ६५ पानी अहवालात अन्य अधिकाऱ्यांसोबत कार्यालयीन ब्रिफिंगशिवाय अनिल देशमुखांच्या घरी सचिन वाझे आणि देशमुख यांची भेट झाल्याचे पुरावे नाहीत. 
वाझेंना पोलीस दलात घेण्याचा दोन दिवसात गुप्तचर विभागाच्या प्रमुख पदी बसवण्याचा निर्णय आयुक्त पातळीवर झाला.

No comments:

Post a Comment