Breaking

Tuesday, 31 August 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे - मंदीरे उघडण्यासाठी माजलगाव येथे भाजपचे शंखनाद आंदोलन.


*मंदिरे उघडण्यासाठी माजलगाव येथे भाजपचे शंखनाद आंदोलन*
माजलगाव, दि.30(प्रतिनिधी ): मागील पाच महिन्यापासून बंद असलेली राज्यातील हिंदू देव देवतांची मंदिरे भाविक भक्तांना दर्शनासाठी उघडावीत, या प्रमुख मागणीसाठी तालुका भाजपच्या वतीने आज शहरातील हनुमान चौक येथील हनुमान मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक समन्वय  आघाडीच्यावतीने आज राज्यभरात शंखनाद आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून माजलगाव येथे  ही भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे, लोकप्रिय खा. डॉ. प्रीतम ताई मुंडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजलगाव विधानसभेचे नेते रमेशराव आडसकर यांच्यामार्गदर्शनाखाली सकाळी 11 वाजता शहरातील हनुमान चौक येथील हनुमान मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले.राज्यात बार, खाजगी कार्यालये, खाजगी प्रवासी वाहतूक इत्यादी सह जवळपास सर्वच सुरू असताना केवळ हिंदू देव देवतांची मंदिरे मात्र मागील पाच महिण्या पासून बंद आहेत. मंदिरे बंद असल्यामुळे बाजारपेठेचे अर्थचक्र मंदावले आहे. मंदिर म्हटले की आपल्याला केवळ पुजाऱ्याचे पोट दिसते. पण मंदिरामुळे फूल उत्पादक शेतकरी,पान फुल, खेळणी,धार्मिक ग्रंथ विक्रेते,प्रसाद विक्रेते, गाईड इत्यादी सह शेकडो प्रकारच्या व्यवसायिकांचे पोट भरते.परंतु, कोरोणाच्या नावाखाली मागील पाच महिन्यापासून मंदिरे बंद असल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. राज्यातील महा विकास  आघाडी सरकारला या प्रश्नांशी कसले ही देणेघेणे असल्याचे दिसत नाही.त्यामुळे या महत्त्वाच्या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज हे आंदोलन करावे लागले, असे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले.इतर राज्यांप्रमाणे राज्यात ही लवकरात लवकर मंदिरे उघडावित. अन्यथा, भाजपच्या वतीने यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा ही आंदोलकांनी दिला आहे.. भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत... यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.तहसीलच्या वतीने... नायब तहसीलदार भंडारे  यांनी निवेदन स्वीकारले. भाजप जिल्हा सचिव बबनराव सोळंके माजी नगराध्यक्ष डॉक्टर अशोक तिडके माजी उपसभापती निळकंठराव भोसले भाजप शहराध्यक्ष  सुरेश दळवे नगरसेवक दिपक मेंडके नगरसेवक विनायक रत्नपारखे सरपंच जयराम गायकवाड सरपंच आण्णासाहेब काळे डॉ प्रशांत पाटील माजी भाजप तालुकाध्यक्ष हनुमान कदम ईश्वर खुरपे  बबन अण्णा शिरसठ बाळासाहेब शिरसागर अर्जुन पायगन सूर्यकांत दराडे छगनराव घाडगे राम गायकवाड भास्कर गिरी ज्ञानेश्वर पवार नारायण मेंडके धनंजय नितीन अमर गिरी रवि गायकवाड मनोज फडके उमेश जाधव विकास गोरे राम शिंदे मल्हारी ढगे अशोक ढगे जयपाल भिसे रवी कुराडे ईश्वर जाधव अमोल झगडे सचिन बजाज सरपंच नारायण गवळी राहुल शिरसागर भारत सोळंके ज्ञानोबा सोळंके परसराम सोळंके विजय रांजन दत्ता महादेव पवार चंद्रकांत घाडगे संतोष रासवे दीपक राव शिंदे उपसरपंच रघुपती शेळके यावेळी सर्व  भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment