उजनी भरू लागले, साठीकडे वाटचाल बंडगार्डनमधून ११०६१ क्युसेकने विसर्ग सुरू
सोलापूर (भीमानगर) : जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखले जाणारे उजनी धरण ५८ टक्के भरले असून, दोन दिवसात साठीकडे वाटचाल करू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. पुढचा रब्बी हंगाम सुखकर जाण्यासाठी लवकरच धरणाचा १०० टक्के साठा व्हावा, यासाठी शेतकऱ्यांमधून प्रार्थना केली जात आहे.
चासकमान धरण बुधवारी १०० टक्के भरले असून बुधवारी दुपारी १ वाजता चासकमान धरणाच्या सांडव्यावरून ९२५ क्युसेकवरून १२९५ क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवून तो भीमा नदीच्या पात्रात सोडला आहे. तसेच विद्युत गृहातून ८५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यापैकी ५५० क्युसेक कालव्यातून चालू आहे आणि ३०० क्युसेक कि.मी. ०/८१० मधील अतिवाहकमधून नदीत सोडण्यात आले आहे.
भीमा नदीत एकूण १५९५ क्युसेक एवढा विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व हेव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी / जास्त करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उजनीत येणाऱ्या पुणे जिल्ह्यातील धरण साखळीमधील नऊ धरणे शंभर टक्के भरली आहेत.
आगामी काळात पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचा फायदा उजनीला नक्कीच होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून भीमा खोऱ्यात पावसाने विश्रांती घेतली असल्याने उजनीत येणाऱ्या हेव्यामध्ये घट झाली आहे. तरी देखील बंडगार्डनमधून ११०६१ क्युसेक विसर्ग, तर दौंडमधून ५६८१ क्युसेक विसर्ग उजनीत सुरू आहे. त्यामुळे उजनीची टक्केवारी दिवसेंदिवस वाढत आहे.
उजनीची सद्य:स्थिती
एकूण पाणीपातळी ४९६.७०५ मी.
एकूण पाणीसाठा ४९४.७०५ मीटर ९४.२१ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा ३०.५६ टीएमसी
टक्केवारी ५८ %
येणारा विसर्ग बंडगार्डन ११०६१, दौड ५६८१


No comments:
Post a Comment