मौजे मोडनिंब येथील प्राथमीक आरोग्य केंद्रास कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी नेमन्यात यावा अशी मागणी सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याणचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे यांनी यांनी निवेदनाद्वारे मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ दिलीप स्वामी यांचेकडे केली आहे.
माढा तालुक्यातील मौजे मोडनिंब येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सदर ठिकाणी मोडनिंब, बैरागवाडी, जाधववाडी, तुळशी, अरण, सोलंकरवाडी, बावी, भेंड, पडसळी, लऊळ आदी गावांतील नागरिक उपचारासाठी येतात. परंतु सध्या कोरोनाच्या काळातही कायमस्वरूपी वैदयकीय अधिकारी उपलब्ध नाहीत.
त्यामुळे कोरोना साथीच्या रोगाच्या काळातही नागरिकांच्या आरोग्याची प्रचंड प्रमाणात हेळसांड होत आहे. परंतु कायमस्वरूपी वैदयकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत परिणामी रुग्णांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
तरी मौजे मोडनिंब, ता.माढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कायमस्वरूपी २ (दोन) वैदयकीय अधिकारी तातडीने उपलब्ध करून देण्यासंदर्भात संबधित विभागास आदेश द्यावेत ही नम्र विनंती. जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा परिषदेच्या मार्फत आरोग्य सेवा मिळेल. अशी मागणी आपल्या निवेदनात कांबळे यांनी केली आहे.


No comments:
Post a Comment