Breaking

Thursday, 8 July 2021

अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ - रामदास आठवले यांना मंत्रीमंडळ विस्तारात बढती द्यायला हवी होती.



केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मंत्रीमंडळ विस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बढती द्यायला हवी होती  भाजपने दलित समाजाची सहानुभूती मिळवण्याची संधी घालवली आहे असे वाटते  रामदास आठवले यांची महाराष्ट्रात सर्वपक्षीय नेते समाज कार्यकर्ते यांच्याशी सलोखा मैत्रीचे चांगले संबंध आहेत  भाजपने आठवलेंना बढती द्यायलाच हवी होती कारण त्यांनी महाराष्ट्रात भाजपसोबत युती करून त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे चांगले संघटन आहे  महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ता हशील करायची असेल तर आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाचे सोबत राहिले तरच राजकीय समीकरण व सत्तेचे गणित जुळु शकेल अशी वस्तुस्थिती आहे  वास्तविक पाहता आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात  त्यांना बढती का दिली नाही असा सवाल दलित समाजातुन विचारला जात आहे   वापरून फेकून द्या अशी भाजपची चाल न ओळखण्यात दलित समाज अपरिपक्व राहिलेला नाही सामाजिक राजकीय प्रगल्भता चांगलीं त्यांना आहे  जिकडे रामदास आठवले तिकडे त्या पक्षाची सत्ता असे राजकीय गणितं महाराष्ट्रात  अनुभवायला मिळते  भाजपची चाल त्यांच्याच अंगलट येऊ शकते  भाजपला महाराष्ट्रात रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाशिवाय सध्या तरी दुसरा पर्याय असुच शकत नाही.

No comments:

Post a Comment