जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समिती सदस्य पदी प्रा सुहास पाटील यांची नियुक्ती- जिल्हा दक्षता व सनियंत्रण समिती सदस्यपदी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा सुहास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्या संदर्भातील नियुक्ती पत्र जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सहीने मिळाले आहे.प्रा सुहास पाटील यांची निवड माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी गव्हरमेंट आॅफ ईंडिया मिनीस्ट्री आॅफ काॅरपोरेट अफेअरर्स या कोट्यातुन केली आहे.त्याबरोबरच भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माळशिरसचे के के पाटील, करमाळ्याचे गणेश चिवटे या सदस्यांचीही नियुक्ती समिती सदस्स म्हणून झाली आहे.या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या अंतर्गंत रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, संजय गांधी निराधार योजना,ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री घरकुल योजना (ग्रामीण व शहरी), प्रधानमंत्री कृषी सिंचन व कृषी विमा,राष्ट्रीय आरोग्य अभियान,सर्व शिक्षा अभियान,एकात्मिक बाल विकास योजना,ग्रामीण मध्यान्न भोजन योजना,राष्ट्रीय महामार्ग योजना, आदी केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत ३२ विविध योजनांचा समावेश होतो.या समीतीच्या माध्यमातुन योजनांची अंमलबजावणी, निधीचे समान वाटप,नियंत्रण व देखरेख करण्याचे काम होत असते.या समितीमध्ये जिल्ह्यातील खासदार अध्यक्ष व सहअध्यक्ष म्हणून पदसिद्ध असतात. तर सचिव म्हणून जिल्हाधिकारी या समितीचे कामकाज पाहतात.या समितीमध्ये सदस्य म्हणून जिल्ह्यातील सर्व विधानसभा व विधान परिषदेचे आमदार तसेच महापौर व जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा समावेश आहे.दर तीन महिन्याला जिल्हाधिकारी या समितीची आढावा बैठक घेऊन सर्व योजनांच्या विकास कामांचा आढावा घेतला जातो.या बैठकीला सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित असतात.अशा या महत्त्वाच्या जिल्ह्यातील दक्षता समितीवर प्रा सुहास पाटील यांची नियुक्ती झाली आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. प्रा पाटील यांनी यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या राज्य कृषिमूल्य आयोगाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.प्रा पाटील यांच्या निवडीबद्दल खासदार रणजितसिंह निंबाळकर माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनीही अभिनंदन केले आहे. *चौकट*-दक्षता समितीवर सदस्स नियुक्तीचे पत्र मला मिळाले.या समितीच्या माध्यमांतुन गोरगरिब कुटूंबांना शासनांच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन देण्याचा प्रयत्न करीन.योजनांची अंमलबजावणी काटेकोर पद्धतीने होण्यासाठी प्रशासनावर लक्ष ठेवून जनतेपर्यंत योजना पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहोत..प्रा सुहास पाटील.संपर्कप्रमुख रयत क्रांती संघटना.
Wednesday, 7 July 2021
Home
/
महाराष्ट्र
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण ( दिशा) समिती सदस्य पदी प्रा. सुहास पाटील यांची नियुक्ती.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण ( दिशा) समिती सदस्य पदी प्रा. सुहास पाटील यांची नियुक्ती.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment