ग्रामपंचायत भोसरे च्या उपभागास प्राथमिक गरजां पासून वंचित ठेवण्याचा प्रकार, याबाबत अधिक माहिती अशी की- चांदणे वाडा येथील हात पंप हा 40 वर्ष जुना आहे. वारंवार बंद पडत असल्याने ग्रामविस्तार अधिकारी यांना या विषयी अर्ज केले होते. अर्जदार अमोल हावळे यांनी पंचायत समिती कुर्डूवाडी यांच्या कडे अर्ज केले होते. 2019 मध्ये पंचायत समिती कुर्डूवाडी यांच्या कडे अर्ज करून सुधा त्यां नी हात पंप दुरूस्ती करण्यासाठी सहकार्य केले नाही. त्या वेळेस जिल्हा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडे अर्ज केला पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला. पाणी पुरवठा विभाग अधिकारी वाघमारे साहेब यांनी अमोल हावळे यांच्या बरोबर पाणी समस्या बाबत चर्चा केली ग्रामपंचायत भोसरे हि पंचायत समिती कुर्डूवाडी कडे हात पंप दुरुस्ती करण्यासाठी करार करत नाही आणि त्या कामाचे पैसे सुध्दा पंचायत समिती कुर्डूवाडी कडे जमा करत नाही. त्या कारणाने आम्ही तुमच्या हात पंप दुरूस्ती चे काम करणार नाही असे पंचायत समिती ने सांगितले. पाणी हे अत्यावश्यक असताना ग्रामपंचायत भोसरे या विषयावरून किती गाफील आहे हे समजते. पाणी मिळण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालया पर्यंत अर्ज करावा लागतो. पाणी मिळविण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कुर्डूवाडी या सर्व कार्यालया च्या माध्यमातून ग्रामविस्तार अधिकारी यांना पाण्याची टंचाई कायम सोडविण्यासाठी त्या ठिकाणी हात पंपा ची बाॅडी साचा नवीन बसविण्यास भाग पाडले. हात पंपा ची बॉडी साचा बसवण्यासाठी सचिन ताकतोडे, सागर कसबे, सुदर्शन बडेकर,अक्षय कसबे, निलेश ताकतोडे, कुणाल कसबे या सर्वांनी सहकार्य केले.
Monday, 5 July 2021
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment