:- भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्ताधारी आघाडी सरकारला व स्थानिक प्रशासनाला लक्षात आणून देण्यासाठी लक्षवेधी उपक्रम राबविण्यात आला. शहरातील उड्डाणपूलावरील खड्डे बुजवून या समस्येकडे लक्ष वेधले आहे. अशी माहिती भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी दिली आहे.
शहराचा मध्यवर्ती वाहतुकीचा दुवा असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर ठिक ठिकाणी मोठ मोठे खड्डे झाले होते. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे वारंवार वाहतूक खोळंबलेली असते नागरिकांना याचा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो याकडे कोणाचे लक्ष नाही सत्ताधारी विकासाच्या फक्त गप्पा मारतात प्रत्यक्षात मात्र याकडे दुर्लक्ष करतात शहरातील नागरी समस्या वर लक्ष वेधण्यासाठी माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून दि.25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शहरातील उड्डाणपुलावरील खड्डे बुजून अनोख्या पद्धतीने उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात मोठ्या संख्येने भारतीय जनता युवा मोर्चा चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:
Post a Comment