Breaking

Monday, 26 July 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे - 26 जुलै रोजी पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेचा लाभ घ्या..अरूण राऊत.


26 जुलै रोजी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव महाराष्ट्राच्या माजी मंत्री संघर्ष कन्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेचा लाभ घ्या-अरुण राऊत
: प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊन आपले कुटुंब सुरक्षित करावे, असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी केले आहे.
 याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, समाजातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, असंघटित कामगार, गोरगरीब,वंचित घटकांना विमा योजनेचा लाभ घेता यावा यासाठी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने प्रधानमंत्री विमा योजना ही अत्यंत महत्त्वकांक्षी योजना लागू केली आहे. या योजनेनुसार बँकेत बचत खाते असलेला प्रत्येक खातेधारक केवळ बारा रुपये वार्षिक हप्ता या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेनुसार केवळ बारा रुपयाच्या हप्त्यांमध्ये वर्षभर दोन लाख रुपयाचे अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. 18 ते 70 वयोगटातील सर्व बचत खाते धारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. भीमा संरक्षणामध्ये अपघातामुळे येणारे कायमस्वरूपी अपंगत्व सुद्धा समाविष्ट आहे. विमा संरक्षण कालावधी 1 जून ते 31 मे असा आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व बचत खाते धारकांनी आपले खाते ज्या बँकेत आहे तेथे एक अर्ज भरून द्यायचा आहे. त्यानंतर खात्यातून ऑटो डेबीट द्वारे बारा रुपये वजा होऊन अपघात विम्याचे संरक्षण मीळणार येणार आहे. खाजगी विमा कंपन्यांचे विमा संरक्षण घ्यायचे म्हटल्यास मोठा खर्च येतो. अपघाताचे वाढलेले प्रमाण पाहता सर्वांनी प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेचा लाभ घेऊन आपले कुटुंब सुरक्षित करावे, असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment