Breaking

Wednesday, 14 July 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे - डुब्बाथडी ते वाघोरा येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेल्या डांबरीकरण रस्त्याची व पुलाची गुणनियंत्रकामार्फत चौकशी करावी.


डुब्बाथडी ते वाघोरा येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत झालेल्या डांबरीकरण रस्त्याची व पुलाची गुणनियंत्रका मार्फत चौकशी करावी..
                                 राहुल तौर
माजलगाव : तालुक्यातील डुब्बाथडी ते वाघोरा हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर झालेला डांबरी रस्ता व पुल आहे , सदर डांबरी रस्त्याच्या साईट पंख्याचे काम थातुरमातुर पध्दतीने केले असून माती मिश्रीत मुरुम व अत्यल्प खडी वापरण्यात आलेली आहे , डांबरी रस्त्याची योग्य प्रकारे दबई केलेली नसुन डांबर देखील अत्यंत कमी स्वरूपात वापरल्याने रस्त्याचे काम  निक्रष्ट दर्जाचे व अंदाजपत्रका प्रमाणे झाले नसल्याचे सक्रतदर्शनी दिसून येत आहे .
डांबरी रोड चालू असलेल्या पावसाळ्यात वाहून जाण्याची शक्यता आहे , डांबरी रोड वाहून गेल्यास ग्रामस्थांना व पंचक्रोशीतील नागरिकांना दळवळणासाठी व रहदारीसाठी अडचण निर्माण होवून अपरिमित असे नुकसान होईल.
डांबरी रस्त्या प्रमाणेच पुलाचे काम देखील अत्यंत दर्जाहीन झालेले असुन अत्यंत दुय्यम दर्जाचे सिमेंट , वाळू व ठिसूळ दगडांचा पुलबांधनी साठी वापर केलेला आहे , पुलाच्या मजबुती साठी व तडे जावू नयेत यासाठी आवश्यक असलेली केव्हरींग योग्य प्रकारे केलेली नसल्याने पुल ढासळून रहदाऱ्यांच्या जिवीतास धोका होण्याची संभाव्य शक्यता आहे पुलाला , आताच तडे पडलेले आहेत ते झाकण्यासाठी मुरुम माती वापरली आहे.
सदर दोन्ही कामे अत्यंत निक्रष्ट दर्जाचे झालेली असून शासकीय अंदाजपत्रका प्रमाणे झालेली नाहीत , हा शासकीय मालमत्तेचा अपहार करण्याचा प्रकार असुन शासनाची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे .
मुख्य कार्यकारी अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांनी दोन्ही कामाची प्रत्यक्ष स्थळपाहणी करावी व कामाची गुणनियंत्रका मार्फत तपासणी करावी ,  काम तपासणी अहवालात दर्जेहीन आढळून आल्यास दोन्ही कामाची बीले अदा करु नयेत , तसेच संबंधीत गुत्तेदार यांना दर्जेदार करण्यासाठी लेखी निर्देश द्यावेत , आपल्या कार्यालयाने गुत्तेदार यांच्या विरुद्ध केलेल्या कार्यवाही चा अहवाल निवेदकास द्यावा अन्यथा कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल अशा स्वरुपाचे निवेदन मुख्य कार्यकारी अभियंता , बीड यांना, राष्ट्रवादी कॉंग्रेस विद्यार्थी आघाडीचे बीड जिल्हा सरचिटणीस राहुल तौर व काँग्रेसचे माजलगाव तालुका सरचिटणीस अंकुशराव तौर यांनी दिलेले आहे , 
निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडीत व जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती जयसिंह सोळंके यांना देण्यात आलेल्या आहेत....

संपादक महोदय , 
 आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रात , ग्रामस्थांच्या वतीने दिलेल्या बातमीस जिव्हाळ्याची समस्या ग्राह्य धरून , समस्येस प्रकाशित करण्याची तसदिक घ्यावीत ...ही नम्र विनंती
                निवेदक
            
              राहुल दिगंबर राव तौर 
           
            अंकुशराव तौर

No comments:

Post a Comment