दि.२१. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून विवेकानंद प्रतिष्ठान व पतंजली योग समिती अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि.२१ जुन २०२१ रोजी सकाळी ६ वाजता विठ्ठल मंदिर, पटांगण एवन चौक अक्कलकोट येथे योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
योग शिक्षक पतंजली योग समितीचे *युवा जिल्हा प्रभारी मोहन कुंभार यांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थ प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करुन सुरुवात करण्यात आले.*
यावेळी व्यासपिठावर अक्कलकोट तालुक्याचे आमदार तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, अविनाश मडीखांबे, प्रभाकर मजगे,दयानंद बिडवे, मल्लिकार्जुन मसुती, विलास कोरे, *मोहोळ तालुका युवा प्रभारी ओंकार कांबळे उपस्थित होते.*
योग प्रशिक्षक मोहन कुंभार यांनी कोरोना काळात योगाचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिक करून सदृढ आराेग्यसाठी दैनंदिन जीवनात प्रत्येकाने योगा करावा असे सांगितले.
योग शिबिरास राजकुमार उंबराणीकर, विजयकुमार पाटील, विश्वनाथ देवरमनी, लक्ष्मण पाटील, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, राजकुमार झिंगाडे, मल्लिकार्जुन अाळगी, ऋषी लोणारी, अंकुश चौगुले, आतिश पवार, डाॅ.सतिश बिराजदार, विकास तळवार,ओंकार कांबळे,प्रकाश पाटील,चंद्रकांत दसले यांची उपस्थित होती.


No comments:
Post a Comment