Breaking

Sunday, 6 June 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते - सातारा जिल्हा कोरोना परिस्थिती आढावा.


: सातारा जिल्ह्यात दुसऱ्या टप्यात गेल्या दोन-तीन महिन्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. जिल्ह्यात सध्य स्थितीत 430 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तर 27 गावांनी कोरोनाचा शिरकाव होवू दिला नाही. यामध्ये पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यातील प्रत्येकी 9 गावांचा समावेश आहे. या गावांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले असून इतर गावांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अनिरूध्द आठल्ये यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यात सर्वच भागात कोरोनाचा शिरकाव झालेला पहायला मिळाला आहे.
: कोरोना बाधित झाल्यानंतर अनेक गावांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करून कोरोनाला गावातून हद्दपार केले. परंतु सातारा जिल्ह्यात आजही 27 गावात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही, त्यांनी कोरोनाला गावच्या वेशीबाहेरच ठेवण्यात यश मिळविले आहे. गावातील सामुहिक प्रयत्नामुळेच हे शक्य झाले आहे. या गावांचा आदर्श इतरांना घेणे गरजेचे आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव नसलेली 27 गावे खालीलप्रमाणे

पाटण तालुका (9) : नेचल, नानेल, पाचगणी, काहिर, वाडीकोतावडे, भांबे, पाळशी, पाणेरी, सातर, महाबळेश्वर तालुका (9) : आमशी, रामेघर, शिंदी, वलवन, आकल्पे, निवळी, आरव, मोरणी, उचाट, सातारा तालुका (4) : वेणेखोले, सावली, वडगांव, पुनवडी, जावली तालुका (4) : गोंदेमाळ, कारगाव, भालेघर, कोळघर, वाई तालुका (1) : ओहळी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात एका जागेवर बसून भाजीपाला विक्री करण्यास नगरपालिका प्रशासनाकडून सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यानंतरही या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या भाजी विक्रेत्याविरूद्ध कराड नगरपालिकेचे कठोर भूमिका घेत पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. दुपारपर्यंत दहा ते बारा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करत त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.


कोरोना काळात कराड शहरातील मंगळवार पेठेतील पांढरीचा मारुती, कन्या शाळा परिसर, कृष्णा नाका परिसर तसेच शहरातील मार्केट यार्ड कार्वे नाका यासह अन्य परिसरात भाजी विक्रेते मनमानीपणे एकाच जागेवर बसून भाजी विक्री करत होते.
त्यामुळेच नगरपालिकेने  कारवाई करत सुमारे १० ते १२ भाजी विक्रेत्यांकडून दंड वसूल केला आहे.
याशिवाय संबंधितांचे साहित्य, भाजीपाला, फळे जप्त करत सर्व विक्रेत्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. ही कारवाई दिवसभर सुरूच राहणार असे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासनाकडून कडक कार्यवाही करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment