स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ओबीसींना पूर्ववत राजकीय आरक्षण लागू करावे,या मागणी साठी भारतीय जनता पक्ष माजलगावच्या वतीने उद्या दि.२६ जून रोजी सकाळी १०.३० वा. एन.एच.६१ वर सिंधफना पूल,माजलगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,राज्य सरकारच्या नाकर्तेपणा मूळे राज्यातील ओबीसी बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळणारे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे.ओबीसींच्या हक्काचे आरक्षण पूर्ववत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपने राज्यभरात एकाच दिवशी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप माजलगाव तालुका च्या वतीने माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा ताई मुंडे,लोकप्रिय खासदार डॉ.प्रीतम ताई मुंडे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शना खाली मतदार संघाचे नेते रमेषराव आडसकर यांच्या नेत्वाखाली दि.२६ जून रोजी सकाळी १०.३० वाजता एन.एच.६१ वर सिंधफना पुल येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.यावेळी कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी,नगरसेवक,सरपंच,प.स.सदस्य,बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, शक्ती केंद्र प्रभारी,कार्यकर्ते व सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजप तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment