Breaking

Friday, 25 June 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - संपूर्ण महाराष्ट्र तिसर्या लेवलमध्ये, कोरोनासह डेल्टा प्लसच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे निर्णय.


*संपूर्ण महाराष्ट्र तिसऱ्या लेवलमध्ये , कोरोनासह डेल्टा प्लसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय* 

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हळूहळू होत असलेली कोरोना रुग्णसंख्येतील वाढ आणि डेल्टा प्लसचे आढळून आलेले रुग्ण यामुळे राज्य सरकारनं नव्यानं नियमावली जारी केली आहे. 

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारच्या नव्या आदेशानं सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या टपप्यातील निर्बंध लागू करावे लागणार आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांना याशिवाय वेळोवेळी शासनाकडून देण्यात आलेले आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या पाहून निर्णय घेण्यास सांगण्यात आलं आहे. 

. जेणेकरून ज्या भागात करोनाचा प्रादुर्भाव आहे, अशाच ठिकाणी निर्बंध लावता येतील

 *4 जूनच्या आदेशातील तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध* 

अत्याआवश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील. 

मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. 

सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील. 

लोकल आणि रेल्वे बंद राहतील. 

मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा असेल. 

50 टक्के क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील. 

आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील. 

स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. 

मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी 2 पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील. 

लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. 

बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. 

शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी 2पर्यंत सुरु असेल. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.

No comments:

Post a Comment