Breaking

Monday, 7 June 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- काॅग्रेस अनु जाती विभागाच्या वतीने काळे झेंडे दाखवत केंद्र सरकार च्या इंधन दरवाढ विरोधात निदर्शने.


काँग्रेस अनु जाती विभागाच्या वतीने काळे झेंडे दाखवत केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ विरोधात निदर्शने

इंधन दरवाढ मागे घ्या अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल-- दत्ता कांबळे

माजलगाव:(प्रतिनिधी):काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व काँग्रेस अनु जाती विभागाचे प्रंताध्यक्ष विजयअंभोरे व जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या सूचनेवरून बीड जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाच्या वतीने जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांच्या नेतृत्वात केंद्रातील मोदी सरकारच्या इंधन दरवाढ विरोधात काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती चे सदस्य दत्ता कांबळे यांनी बोलताना सांगितले की केंद्रातील मोदी सरकारच्या दिवसेंदिवस होत असलेली इंधन दरवाढ ही शेतकरी व शेतमजूर सह सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणार आहे .आज पेट्रोल ने शंभरी पार केली आहे तर डिझेल शंभरी गाठत आहे, गॅस चा भाव सध्या नऊशे रुपय म्हणजेच जवळपास एक हजार रुपये पर्यंत गेला आहे .ही अन्याय कारक दरवाढ जर मोदी सरकारने माघे घेतली गेली नाही तर यापुढे जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाच्या वतीने याच्या ही पेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी दिला आहे.यावेळी "मोदी सरकार हाय हाय ","इंधन दरवाढ मागे"अश्या जोरदार घोषनाबाजीही करण्यात आली .यावेळी अनंत घडसींगे,सुधाकर कांबळे ,रमेश जाधव ,श्रीमंत कांबळे ,विकास भारस्कर ,लखन कांबळे ,अनिल कांबळे ,अशोक ढगे दिपक कांबळे, मुस्ताक कुरेशी, दयानंद पौळ सह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment