Breaking

Monday, 7 June 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे - अभाविप कडून महाविद्यालय शुल्क वसुलीचा निषेध.


अभाविप कडून महाविद्यालय शुल्क वसुलीचा निषेध...



अखिल भारतीय विद्यार्थी परिषेच्या वतीने काल अंबाजोगाई मध्ये महाविद्यालय शुल्क माफी व विविध शैक्षणिक मागण्यांना घेऊन आंबेडकर चौकात सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी अभाविप चे जिल्हा कार्यालय प्रमुख मंगेश ढगे, जिल्हा SFD प्रमुख आदित्य राखे, शहर सह मंत्री अथर्व जहागिरदार, मोहिनी सोळंके, मयुरी पाटील, तुलसी तंवर, धनश्री शेप, ओमकार चव्हाण, किरण उडानशिव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
महाविद्यालय गेल्या वर्ष भरा पासून बंद आहेत मात्र लॉकडाऊन शिथिल होताच महाविद्यालया कडून पार्किंग शुल्क, ग्रंथालय शुल्क. जिमखाना शुल्क, प्रॅक्टिकल शुल्क असे अनेक प्रकारच्या शुल्काची वसुली महाविद्यालय शुल्काचा नावाखाली केली जात आहे. विद्यार्थी या घेतल्या जाणाऱ्या शुल्काचा विरोध करत आहेत. कारण कोरणाजण्य परस्थिती मुळे महाविद्यालय गेल्या वर्ष भरा पासून बंद होती, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सुविधांचा वापरच केला नाही तर म्हणुन हे शुक्ल माफ करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थी परिषद अनेक दिवसा पासून करत आहे. मात्र शासन या कडे लक्ष देत नसल्याने महाविद्यालय विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण करत आहेत. कोरोनामुळे अनेक विद्यार्थी व पालकांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. या मुळे हे अकारण घेतले जाणारे शुल्क माफ करावे व परीक्षा शुल्कात विद्यार्थांना सवलत द्यावी अशी मागणी विद्यार्थी परिषद करत आहे. शासनाने या कडे लक्ष न दिल्यास आगामी काळात अभाविप तीव्र आंदोलन करेल असे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment