भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माढा तालुक्याच्या वतीने OBC आरक्षण रद्द झाल्यामुळे कुर्डूवाडी शहरात चक्काजाम अंदोलन..
ओबीसीं समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालावरून धोक्यात आलेले आहे.
या निकालानुसार पंचायत ओबीसी समाजाची या बाबतची राज्यसरकारची फेरविचार याचिकासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दि. २८ मे रोजी फेटाळली आहे. राज्यशासनाने वेळीच याची दखल घेतली असती आणि न्यायालयात भक्कमपणे ओबीसींची बाजू मांडली असती, तर आरक्षण रद्द झाले नसते. याचे दूरगामी परिणाम सर्वच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर होणार आहेत. तरी कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण रद्द न होता अबाधीत राहिलेच पाहिजे. याची दक्षता व कार्यवाही राज्यशासनाने करावी. महाराष्ट्र शासनाच्या या अतिशय महत्त्वाचे राजकीय आरक्षण वाचविण्यात महाराष्ट्र शासनाचे अक्षम्य दिरंगाई केली. याला महाराष्ट्र शासन आणि विशेषत: ओबीसी कल्याण मंत्रालयाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून आम्ही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करतो.असे या वेळी सांगण्यात आले.
या निकालाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील 'नागरिकांच्या मागास प्रवर्गा'चे (ओबीसींचे) आरक्षणच धोक्यात आलेले आहे. 'महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१' मधील सेक्शन १२(२)(क)मध्ये नागरिकांच्या मागासवर्गाच्या आरक्षणाची तरतूद असली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार के. कृष्णमूर्ती वि. भारत सरकार या खटल्याच्या निकालात नमूद केलेल्या तीन अटींची पूर्तता राज्यशासनाने फार पूर्वीच करणे आवश्यक होते. जेणेकरून ओबीसी आरक्षण आज धोक्यात आले नसते. तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यशासनाने स्वतंत्र व समर्पित आयोग त्वरीत गठीत करून राज्यातील 'नागरिकांच्या मागास प्रवर्गा'च्या (ओबीसींच्या) मागासलेपणाचे स्वरुप, परिणाम आणि लोकसंख्येचे प्रमाण याबाबत समकालिन सखोल आणि अनुभवजन्य माहिती (Empirical Data) गोळा करावी. आणि आयोगाच्या शिफारशींच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार आरक्षणाचे प्रमाण निश्चित करून ते पुनर्स्थापित करावे.
या मागण्या त्वरीत मान्य न झाल्यास राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील आगामी निवडणूका घेण्यास विरोध करण्याबरोबरच सर्व मागण्यांसाठी आंदोलनाचे मार्गही आम्हाला पत्करावे लागतील असा इशारा या वेळी देण्यात आला.
या मागणी साठी भारतीय जनता पार्टी अध्यक्ष चंद्रकात दादा पाटील, विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणविस,पंकजाताई मुंढे,योगेश अण्णा टिळेकर यांच्या नेत्तुवाखाली संपूर्ण राज्य भर तसेच मा उमेश भाऊ पाटील यांच्या नेत्रुत्वा खाली कुर्डूवाडी शहरात व माढा तालुक्यात चक्का जाम अंदोलन करण्यात आले.
या वेळी भाजपा युवा मोर्चा माढा तालुका अध्यक्ष ऊमेश पाटील,सरचिटणीस सुधिर भाऊ गाडेकर,प्रा.पप्पु ननवरे,दत्ताञय मोरे,लक्ष्मण भाऊ पवार,अमोल कुलकर्णी,संध्या कुंभेजकर,माया माने,श्रीशैल मोरे,बबन ताकभाते,सचिन गायकवाड,राहुल कांबळे,बापु दळवी,अतुल राऊत,बजरंग गायकवाड,अर्जुन माने,गणेश मोरे,पोपट गाडेकर,रामभाऊ राऊत,बापु वाघमारे,सुधिर काशिद,कल्याण वेळेकर,सागर वेळेकर,सोपान दळवी,आदी बहुजन समाज बांधव व भाजपा कार्यकर्ते ऊपस्थीत होतेb.
बालाजी गायकवाड,शाम थोपटे,मकुल वाघ,रोहीत देवकुळे,अशोक गवळी,विजय देवकते,आण्णा देशमाने,किशोर सोनवणे,रुषीकेश सात रकर


No comments:
Post a Comment