सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - 31 मे 2021 जागतिक तंबाखू नकार दिन- याबाबत वृत्त असे की जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सोलापूर जिल्हा.सोलापूर महाराष्ट्र राज्य यांचेवतीने दि.31/5/2021 हा दिवस जागतिक तंबाखू नकार दिन म्हणून साजरा केला जातो. दि.31/5/2021 ते 5 जून 2021 पर्यंत सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रूग्णालय ,व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी तंबाखू नकार दिन साजरा करायचा असून त्याचबरोबर दंतशल्यचिकित्सक यांचे कडून पोस्ट कोविड व सर्व रूग्णांची रॅन्डम ब्लड शुगर व म्यूकोरमायकाॅसीस प्राथमिक तपासणी सोलापूर जिल्ह्यातील सरकारी, ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे करण्यात येणार आहे. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर यांनी केले आहे.
31 मे 2021 हा महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जागतिक तंबाखू नकार दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये म्यूकोरमायकाॅसीस प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कार्यरत उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय स्तरावर तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्या रुग्णांची तपासणी प्रत्येक वर्षी करण्यात येत असते.
सध्या कोवीड बाधित रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. कोविड सेंटर व डेडिकेटेड कोव्हिड सेंटर मधून कोविड उपचार घेऊन घरी गेलेल्या रूग्णांची म्युकरमायकोसीस या आजाराची तपासणी करण्यात येणार आहे. सदर तपासणी 31 मे 2021 ते 5 जून 2021 पर्यंत उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रूग्णालय येथील दंतशल्यचिकित्सक यांच्याकडून घेण्यात येत आहे. तरी सर्व कोविड-19 चा उपचार घेऊन घरी गेलेल्या रूग्णांनी ही तपासणी करून घ्यावी.
सोलापूर जिल्ह्यमध्ये 3 उपजिल्हा रुग्णालय व 7 ग्रामीण रूग्णालयात दंतशल्यचिकित्सक कार्यरत आहेत. त्याचबरोबर ह्या सर्व रूग्णांची रॅन्डम ब्लड शुगर तपासणी आणी मुख कर्करोग तपासणी व तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रूग्णालयात करण्यात येणार आहे. ही सर्व तपासणी उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रूग्णालय येथे मोफत करण्यात येणार आहे असे मा.जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रदीप ढेले यांनी सांगितले आहे. व सर्व रूग्णांना तपासणी करून घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment