Breaking

Monday, 21 June 2021

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - शिवसेनेच्या माध्यमातून 20 व्हेंटीलेटर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द.


 *शिवसेना कोल्हापूर जिल्हा*

*शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री मा.ना.आदित्यजी ठाकरे यांच्या पुढाकाराने व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.उदयजी सामंत यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्राप्त झालेले २० व्हेंटिलेटरस् जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले होते.*

*त्यापैकी ३ व्हेंटिलेटरस् शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय (आय.जी.एम.) प्रशासनास शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मा.मुरलीधर जाधव यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.*

*इचलकरंजी,हातकणंगले व शिरोळ परिसरातील कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आय.जी.एम. रुग्णालय तत्परतेने सेवा देत आहे. त्याच अनुषंगाने शिवसेनेच्या माध्यमातून उपलब्ध झालेले हे व्हेंटिलेटरस् कोविड रुग्णांसाठी जीवनदायी ठरतील असा विश्वास शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मा.मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केला.*

*यावेळी उपजिल्हाप्रमुख महादेव गौड,शहरप्रमुख सयाजी चव्हाण,युवासेना जिल्हा युवा अधिकारी शिवाजी पाटील,माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे,माजी शहरप्रमुख धनाजी मोरे,महेश बोहरा,भरत शिवलिंगे,सागर जाधव,संजय पाटील,अजय घाटगे,सचिन खोंद्रे,सूरज लाड यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.!*

No comments:

Post a Comment