करकंब प्रतिनिधी/ संजय काळे- बहुजन ब्रिगेडचे राजेश खरे बनले कोरोना बाधितांचे देवदूत- याबाबत वृत्त असे की बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे व
प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी कोरोना बाधितांचे प्राण वाचविण्यासाठी आतोनात प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.
बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, तसेच जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांना आॅक्सीजन बेड उपलब्ध होत नसताना व व्हेन्टीलेटर बेड उपलब्ध होत नसताना
या दोन्ही बेडची कमतरता असताना राजेश खरे यांनी जवळ जवळ 70-80 कोरोना बाधित रूग्णांना उपचारासाठी दोन्ही प्रकारचे बेड उपलब्ध करून देऊन त्यांना जिवदान देण्याचे काम राजेश खरे यांनी केले आहे.
बहुजन ब्रिगेड संघटनेत काम करीत असताना बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी तसेच समाजाच्या विविध समस्यांवर संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवला जात आहे व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
त्याच पार्श्वभूमीवर संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर झाल्याने मी सर्वच स्तरावर जनतेची कामे केल्यानंतर मनाला मानसिक समाधान मिळते असे बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी सांगितले. अनेकांचे जीव वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे राजेश खरे कोरोना बाधितांचे देवदूत बनले असल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात दिसून येत असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


No comments:
Post a Comment