Breaking

Sunday, 23 May 2021

संपादक/ विजयकुमार परबत- मराठा आरक्षणासाठी गायकवाड कुटूंबियांचा आत्मदहनाचा इशारा.


संपादक/ विजयकुमार परबत- मराठा आरक्षणासाठी गायकवाड कुटूंबियांचा  आत्मदहनाचा इशारा- याबाबत वृत्त असे की नालगावचे एकाच कुटुंबातील सहा जण 29 मे रोजी करणार आत्मदहन याबाबत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन.... मराठा आरक्षणात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडलेल्या, 








 राज्य शासना मुळेच मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आरोप करून परांडा तालुक्यातील गायकवाड कुटुंबातील सहा जणांनी आत्मदहन करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे 29 मे रोजी राहत्या घरी संपूर्ण कुटुंब आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे गायकवाड कुटुंबाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.









 की मराठा समाजाचा केवळ राजकीय सामाजिक आर्थिक दृष्ट्या वापर केला जात आहे मराठा समाजाला पूर्वीच्या सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही कारण राज्य सरकार हे आरक्षण कायम ठेवण्यात अपयशी ठरले आहे आपली बाजू मांडण्यात हे सरकार कमी पडले आहे त्यामुळे सरकारच्या या भूमिकेचा निषेध म्हणून आम्ही कुटुंबातील व्यक्ती 29 मे रोजी राहत्या घरी आत्मदहन करणार आहोत ई-मेल द्वारे पाठविल्याने या निवेदनावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रतिसाद आला असून, 









 आपली तक्रार सामाजिक न्याय विभागाकडे पाठविण्यात येत असल्याचे त्यात म्हटले आहे निवेदनावर आनंद कुमार गायकवाड राजकुमार गायकवाड ज्ञानेश्वर गायकवाड नागनाथ गायकवाड राधिका गायकवाड सुरेखा गायकवाड देविदास करळे यांच्या स्वाक्षरी आहेत स्वातंत्र्य देत असतानाच भारतात सगळा समाज व्यवस्थित राहू नये तोडा फोडा हे धोरण कायम रहावे.









 अशी रचना तत्कालीन राज्यकर्त्यांनी केली असून आरक्षण हेही दरी कायम ठेवण्यास कारणीभूत ठरत आहे सगळ्यांसाठी समान वागणूक न्याय आरक्षण अधिकार असावा पूर्वीच्या समाजव्यवस्थेत सगळे नागरिक गुण्यागोविंदाने नांदत होते अलीकडे जातीपातीच्या भिंती आडव्या येत आहेत मराठा समाजावर अन्याय होत असताना इथली व्यवस्था आरक्षण नाकारत आहे.









 राज्यकर्त्यांमुळे समाजात दरी निर्माण होत आहे मराठा समाजाची ग्रामीण भागातील परिस्थिती लक्षात न घेता आरक्षण नाकारले जात आहे हा एखाद्या समाजावर जाणीवपूर्वक केलेला अन्याय आहे त्यामुळे आरक्षण नाही तर जगायचे ही नाही असा निर्णय आम्ही कुटुंबीयांनी घेतला आहे असे आनंद कुमार गायकवाड यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment