Breaking

Wednesday, 26 May 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - उजनीच्या पाण्यासाठी जिल्हा पेटला, करमाळा येथे टायर पेटवून राज्य सरकारचा निषेध.

उजनीच्या पाण्यासाठी 'जिल्हा पेटला'

करमाळा तालुक्यात टायरे पेटवुन व्यक्त केला निषेध

* पाणी रद्द चा शासकीय अध्यादेश काढण्याची मागणी

उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने केलेल्या आवाहनानुसार कालपासून जिल्ह्यात आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले असून वेगवेगळ्या ठिकाणी टायर पेटवून शासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे. उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाण्याचा निर्णय जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रद्द झाल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. मात्र आमची पुन्हा एकदा दिशाभूल झाली असल्याचे आंदोलकांचे म्हणणे असुन आज ७ दिवस झाले तरी याबाबत कोणताच शासकीय अध्यादेश निघाला नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की 'सांडपाणी' या शब्दाचा वापर करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातील ५  टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय २२ एप्रिल रोजी झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली, शेतकरी नेत्यांनी आंदोलने केली. त्यामुळे नाईलाजाने जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इंदापूरला पाणी देण्याच्या निर्णयाला स्थगिती देत सदर निर्णय रद्द झाल्याचे सांगितले. मात्र आज सात दिवस उलटून गेले तरी याबाबत कुठलाच शासकीय अध्यादेश निघाला नाही. म्हणून उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने जिल्ह्यामध्ये उग्र स्वरुपाची आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्यानुसार काल पंढरीत टायर पेटवून निषेध व्यक्त केला आणि त्यानंतर आज करमाळा तालुक्यातील. करमाळा - परांडा रोडवर फिसरे येथे शेतकरयानी ठिक रात्री आठ वाजता टायरे पेटवुन रस्ता सरकारचा निषेध करत रस्ता रोखून धरला तसेच करमाळा-  बिगवण रोडवर आज पहाटे कोंडारचिंचोली येथे टायर पेटवुन शासनाचा निषेध नोंदवला

फिसरे कोंडारचिचोली 
या गावांमध्ये शेतकऱ्यांनी टायरे पेटवुन घोषणाबाजी करत शासनाचा निषेध व्यक्त केला. 

No comments:

Post a Comment