Breaking

Saturday, 15 May 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - लसीकरणासंदर्भात नगरसेवक आनंददादा चंदनशिवे यांचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांना निवेदन.


                     14/05/2021

#अंध_अपंग_पत्रकार_एसटी_कर्मचारी, #18_ते_44_वयोगटातील_नागरिकांना_लस #उपलब्ध_करून_द्या_पालकमंत्री_दत्तात्रय_मामा_भरणे #यांच्याकडे_गटनेते_नगरसेवक_आनंद_चंदनशिवे_यांची_मागणी







#शेठ_गोविंदजी_रावजी_आयुर्वेदिक_महाविद्यालय #लसीकरण_केंद्राला_भेट, #पालकमंत्री_दत्तात्रय_भरणे_यांच्या_हस्ते #परिचारिका_सहित_कर्मचाऱ्यांचा_सत्कार









सोलापूर
गटनेते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या विशेष प्रयत्नातून बुधवार पेठ परिसरातील शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय लसीकरण केंद्राला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी भेट दिली या भेटीप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी खालील मागण्या मांडल्या.








1) अंध अपंग नागरिकांचे लसीकरण 
2) 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण 
3) पत्रकार, एसटी कर्मचारी, बँक कर्मचारी यांचे लसीकरण
4) सोलापूर शहरातील नागरिकांना लसीचा पहिला डोस प्राधान्य देण्यासाठी 50% पहिला डोस व 50% दुसरा डोस चे नियोजन करावे.








अशा विविध मागण्या त्या भेटी प्रसंगी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केल्या तसेच या ठिकाणी या लसीकरण केंद्रात भाग घेणाऱ्या आयुर्वेदिक कॉलेजचे डॉक्टर नर्स स्टाफ यांचा सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. 







यावेळी दत्तात्रय भरणे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना सोलापूर जिल्ह्याला लस व रेडमीशिवर इंजेक्शन कमी पडू देणार नाही तसेच ही वेळ राजकारण करण्याची नसून सर्वांनी सोबत मिळून करोना महामारी वर सर्वांच्या सहकार्याने मात करण्याचे आहे असे मनोगत व्यक्त केले
गटनेते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आदर्श लसीकरण केंद्र भरण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले असे जैन समाजातील संघटनेचे हर्षल कोठारी अनिल जैन श्रेणिक कोचर सचिन कोठारी श्रीपाद कोठारी शिंगवी आधी जैन बांधवांचा सत्कार करण्यात आला.







यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर उपायुक्त धनराज पांडे गटनेते नगरसेवक आनंद चंदनशिवे नगरसेवक गणेश पुजारी चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी संतोष पवार डॉ आदर्श मेहता डॉ प्रदीप कोठाडिया अनुप जोशी आदी उपस्थित होते.








या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्शल कोठारी यांनी मानले
सदर कार्यक्रमाला मा नगरसेविका उषा शिंदे अनिल जैन, श्रेनिक कोचर ,पुरुषोत्तम धुत  प्रभूराज मैंदर्गी, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय चे विश्वस्त डॉ. कुंभोजकर ,मेडिकल ऑफिसर अविनाश चव्हाण सर, मेडिकल 








ऑफिसर प्रदीप कस्तुरे सर, बबन शिंदे चाचा सोनवणे कासार सिस्टर, क्लार्क दिपक समर्थ ,सुभाष राठोड ,शिपाई उमेश तिवारी, शिपाई कविता गवळी, शिपाई सुरज गायकवाड, शिपाई वासुदेव शिरनाळ , शिपाई जयपाल वसजडेकर, सोलापूर महानगरपालिका विभागीय कार्यालय क्रमांक 1 चे कनिष्ठ लिपिक पांडुरंग सोनवणे, कनिष्ठ लिपिक सुहास कुलकर्णी ,अवेक्षक  राहुल म्हेत्रे आरोग्य निरीक्षक विजय साळुंखे  इत्यादी उपस्थित होते अशी माहिती 
मोहोळ तलुका युवा अध्यक्ष महादेव गाडे यांनी  
VBP NEWS सोबत  बोलताना  दिली.

No comments:

Post a Comment