कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - पोलिस मित्र संघटना बारामती यांच्या वतीने पोलिस बांधवांना अल्पोपहार, जेवण व गरीब गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप- याबाबत वृत्त असे की बारामती पोलिस मित्र संघटना यांच्यावतीने बारामती येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस बांधवांना अल्पोपहार पाणी बॉटल जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एक हात पुढे मदतीचा हा उपक्रम महाराष्ट्र राज्यातील काही तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे बारामती पोलीस मित्र संघटनेच्या वतीने पोलीस मित्र संघटनेच्या बारामती तालुका महिला कार्याध्यक्ष रोहिणी अनंत खरसे आणि बारामती महिला पदाधिकारी प्रियंका
खरतोडे आनंदी ललिता यांच्यावतीने पोलिस बंदोबस्त करण्यासाठी असलेले पोलीस अधिकारी पोलीस बांधवांना अल्पोपहार पाणी बॉटल व जेवणाची व्यवस्था बारामती येथील पेन्सिल चौकात एमआयडीसी चौकात आदी ठिकाणच्या पोलिसांना मदत पुरविली जात आहे सदरचा उपक्रम हा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आला आहे बारामती तालुक्यात काही हातावरचे पोट असणारे
काम नसल्यामुळे त्यांचे खूप हाल होत आहेत अशा काही लोकांनी फोन करून मग मदत मागितली होती त्या गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले आम्हाला शक्य तेवढी सेवा मी आणि माझ्या सहकारी करत आहोत तसेच कोरोना रुग्णांना बेड मिळवून देणे प्लाजमा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणे तसेच जसे आमचे काम
लोकांना माहिती होत आहे तसे लोक संपर्क करत आहेत असे रोहिनी खरसे यांनी सांगितले आहे. तसेच रोहिणी खरसे आटोळे मॅडम, आनंदी ललिता यांचे आणी बारामती टिमचे कौतुक करण्यात येत असून संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जी.एस.भगत यांनी देखील कौतुक केले आहे.


No comments:
Post a Comment