माढा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर
आ.बबनदादा शिंदे यांची माहिती
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग तसेच जिल्हा वार्षिक योजना यांच्या अंतर्गत माढा तालुक्यातील ग्रामीण मार्गांच्या दुरुस्तीसाठी सात कोटी रुपये तर अतिवृष्टीने खराब झालेल्या रस्त्यासाठी तीन कोटी रुपये असा एकूण 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की,ग्रामविकास विभाग,जिल्हा वार्षीक योजना अंतर्गत 3054 व 5054 योजनेतून ग्रामीण रस्त्यासाठी तसेच अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या माढा तालुक्यांतील रस्त्यांसाठी आ.बबनराव शिंदे,आ.संजयमामा शिंदे, यांनी राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे, भारत (आबा) शिंदे, अंजनादेवी पाटील, रोहीणी मोरे, रोहिणी ढवळे,शुभांगी उबाळे यांच्या निधीतून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झालेला आहे.
कोणत्या गावांसाठी किती निधी मंजूर ते पुढे पहा
यामध्ये माढा तालुक्यातील 1) निमगाव (टें) ते सापटणे (टें) रस्ता रु. 50 लाख, 2) अंजनगांव (उ) ते जामगांव/केवड रस्ता रु. 25 लाख, 3) दहिवली ते पवार वस्ती रस्ता रु.10 लाख, 4) चांदज ते रुपनवर वस्ती रस्ता रु. 25 लाख, 5) सापटणे (भो) ते वडाचीवाडी रस्ता रु.20 लाख, 6) खैराव मानेगांव जोडरस्ता ते देशमुख वस्ती रस्ता रु.10 लाख,7) शेडशिंगे ते निमगांव (टें) रस्ता रु.30 लाख, 8) म्हैसगांव ते नालगांव रस्ता रु.10 लाख,9) कुर्डू ते चौभेपिंपरी रस्ता रु.10 लाख,10) सापटणे (टें) ते एन.एच.65 रस्ता रु. 40 लाख, 11) महातपूर ते दारफळ रस्ता रु. 20 लाख, 12) म्हैसगांव ते वडशिंगे रस्ता रु. 10 लाख, 13) रोपळे ते बिटरगांव रस्ता रु.10 लाख,14) चांदज ते मचालेवस्ती वस्ती रस्ता रु. 20 लाख, 15) लऊळ ते गाडेवस्ती रस्ता रु. 20 लाख, 16) सुर्ली/ शिराळ ते सुतारवस्ती रस्ता रु.10
लाख,17) भुताष्टे ते बावी व्यवहारे वस्ती रस्ता रु. 15 लाख, 18) तांबवे ते मानेवस्ती रस्ता रु. 15 लाख, 19) गारअकोले ते नवीन गावठाण रस्ता रु.10 लाख,20) मानेगांव ते वाकाव रस्ता रु. 25 लाख, 21) भोसरे ते भांबुरे वस्ती रस्ता रु. 10 लाख, 22) मिटकलवाडी रस्ता ते माळेगाव रस्ता रु.10 लाख, 23) निमगांव (टें) ते सापटणे (टें) रस्ता रु. 35 लाख, 24) पिंपळनेर ते भुईंजे रस्ता रु. 10 लाख, 25) टेंभुर्णी,अकलुज रोड ते खरात वस्ती रस्ता रु.10 लाख,26) सापटणे (टें) ते पालवण रस्ता रु. 10 लाख, 27) टाकळी
(टें) ते आलेगांव (खु) रस्ता रु. 15 लाख, 28) हरिनगर ते बेंबळे जोडरस्ता रु.10 लाख, 29) दारफळ,सुलतानपूर ते अंजनगांव (उ) रस्ता (पुल बांधणे) रु. 10 लाख, 30) चिंचोली ते रोपळे (खु) रस्ता रु. 10 लाख, 31) पडसाळी ते पाटीलवस्ती रस्ता रु.10 लाख 32) भुताष्टे ते घाटणे रस्ता रु.10 लाख,33) चांदज ते हेगडकर वस्ती रस्ता रु.15 लाख,34) बावी ते शेटफळ (तालुका हद्द) रस्ता रु.15 लाख, 35) कंदर,दहिवली ते कारखाना (गंगामाईनगर) रस्ता रु.10 लाख, 36) अंजनगांव (उ) ते दारफळ रस्ता रु.15 लाख, 37)कव्हें ते भोगेवाडी रस्ता 30 लाख, 38)शिराळ मा ते उजनी मा रस्ता 15 लाख, 39)अंजनगाव खे ते तांबोळी वस्ती रस्ता 25लाख,
40)सोलंकरवाडी ते मोडनिंब 15 लाख, 41)तांबवे ते राज्य मार्ग /कारखाना,15 लाख 42) ढवळस ते कुर्डुवाडी करमाळा रस्ता 45 लाख,43) कुर्डू गवळेवाडी बारलोणी रस्ता 30 लाख, 44)कापसेवाडी ते कारखाना रस्ता 40 लाख, या रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. सदर रस्त्यांना निधी मंजूर झाल्यामुळे याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे रस्त्याची कामे लवकरच सुरू होणार असणार असल्याचे आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी होऊन ग्रामीण भागातील रस्त्यांचे फार मोठे नुकसान झाले होते अनेक गावांचा संपर्क तुटून रस्ते व पुल वाहून गेल्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होणे साठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा चालू होता. अतिवृष्टीने खराब झालेल्या माढा तालुक्यातील 30 रस्त्यांसाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
आ. बबनदादा शिंदे


No comments:
Post a Comment