सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - राज्यातील लाॅकडाऊन 1 जून पर्यंत वाढला- याबाबत वृत्त असे की राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ब्रेक द चेन अंतर्गत असलेले निर्बंध 1 जून पर्यंत वाढविण्यात आले आहेत, राज्य सरकारने याबाबत नवीन नियमावलीही जारी केली आहे, परराज्यातून महाराष्ट्रात येणार्या प्रवाशांना आरटी पीसीआर ची चाचणी बंधनकारक केली आहे,
तसा याबाबत आदेश जारी करण्यात आल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे, यामध्ये काही निर्बंधही वाढविण्यात आले आहेत. 15 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.
ब्रेक द चेन च्या नवीन नियमानुसार परराज्यातील प्रवाशांना महाराष्ट्रात येण्यासाठी आरटी पीसीआर ची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच तो रिपोर्ट 48 तास आधीचा असायला हवा,
संवेदनशील भागात कडक निर्बंध हे जुन्या आदेशानुसारच असणार आहेत. कारमधून दोन पेक्षा जास्त लोकांना प्रवास करता येणार नाही. लाॅकडाऊनच्या काळात दूध व्यवसाय, व घरपोच सेवा देणार्यांना सूट देण्यात आली आहे. परराज्यातून माल वाहतूक करणार्या वाहनात दोनच जणांना प्रवास करता येणार आहे. त्यांनाही आरटी पीसीआर ची चाचणी बंधनकारक केली आहे व दुकानांना वेळही देण्यात आली आहे.
किराणा मालाची दुकाने, दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्री, भाजीपाला विक्री, फळे, अंडी, मटण, चिकन, मासे, कृषी संबंधित सर्व सेवा, पशुखाध्य, बेकरी, मिठाई दुकाने सर्व प्रकारची खाद्यपदार्थ दुकाने, पाळीव प्राणी खाद्य दुकाने, येणार्या पावसाळ्याशी संबंधित दुकाने ही सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु राहणार आहेत.
No comments:
Post a Comment