खोदकामात सापडला पितळी हंडा..
त्यात सापडलेला खजिना घेऊन मजूर फरार !
अनेकदा शेतात किंवा जुन्या बांधाकामाच्या जागी खोदकाम करताना जुने ऐवज सापडतात.
असाच एक प्रकार राजस्थानात घडला असून एका पितळी हंड्यात खजिना सापडला आहे.
ही बातमी राजस्थानच्या धोलपूर जिल्ह्यातील आहे.
इथल्या एका जुन्या घराचं खोदकाम करताना एक पितळी हंडा सापडला.
हे घर व्यापारी असलेल्या कृष्णा सेठ यांचं आहे.
आपलं जुनं घर पाडून त्या ठिकाणी नवीन घर बांधायचं काम कृष्णा यांनी सुरू केलं होतं.
या कामासाठी सहा मजूर त्यांच्या जुन्या घराच्या जोत्यावर खोदकाम करत होते.
अचानक एका मजुराची कुदळ एका धातूला आपटल्यासारखा आवाज आला.
तेव्हा तिथे खोदून तपासलं असता तिथे पितळी हंडा सापडला.
त्या पितळी हंड्याचं तोंड उघडलं तेव्हा आतला ऐवज पाहून सगळ्यांना धक्का बसला.
आत अस्सल चांदीची नाणी होती.
ही नाणी खूप पुरातन असावी, असा अंदाज तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला आला.
हा खजिना सापडल्याचं समजताच अख्खा गाव तो पाहायला लोटला.
ते पाहून तो हंडा ज्याला सापडला होता, तो मजूर हंड्यासकट फरार होऊ लागला.
काही लोक त्याच्या पाठी धावले.
तेव्हा त्याने त्यातील काही नाणी उचलून गावकऱ्यांच्या दिशेने फेकली.
तेव्हा सगळी गर्दी ती नाणी जमा करण्यासाठी थांबली.
हा प्रकार पोलिसांना कळवण्यात आला.
तेव्हा त्यांनी घटनास्थळाहून १४० नाणी जप्त केली असून उर्वरित नाण्यांसह मजुराचा शोध सुरू आहे.


No comments:
Post a Comment