Breaking

Wednesday, 3 March 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- असा झाला पूजा चव्हाणचा मृत्यू, शवविच्छेदनात माहिती आली समोर.


बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- असा झाला पूजा चव्हाणचा मृत्यू, शवविच्छेदन अहवालात माहीती आली समोर- याबाबत वृत्त असे की गेल्या काही दिवसांपासून राज्यात पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचीच चर्चा पहायला मिळत आहे, दर दिवशी सदर प्रकरणी एक नवा खुलासा होत असल्याचे पहायला मिळत आहे, त्यातच आता महत्वाची माहिती समोर आली आहे, सध्याच्या घडीला पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल वानवाडी पोलिसांना प्राप्त झाला आहे, प्राथमिक अहवालाप्रमाणेच सविस्तर अहवालातही जबर दुखापतीनेच मृत्यू झाल्याचं स्पष्ट होत आहे, दरम्यान पूजाच्या आत्महत्येच्या मूळ कारणापर्यंत पोहचू शकणारा शवविच्छेदन अहवालही वानवाडी पोलिसांना प्राप्त झाला आहे. 
ज्यामध्ये तिच्या मनक्याला आणी डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळेच मृत्यू झाल्याचे कारण समोर येत आहे, तसेच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे, त्यामुळे तपास पूर्ण झाल्यावरच याविषयीची अधिक माहिती दिली जाईल असे या प्रकरणाचा तपास करणार्या अधिकार्यांनी सांगितले आहे, 
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अखेर मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्र्यांवर मोठा दबाव होता, अखेर संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. 
यानंतर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री यांच्या कडे आपला वनमंत्री पदाचा राजिनामा दिला आहे, राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा स्वीकार करावा अशी काहीशी भूमिका संजय राठोड यांनी घेतली होती.

No comments:

Post a Comment