Breaking

Tuesday, 16 March 2021

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी/ सचिन खंदारे- सचिन वाझे यांची तब्येत बिघडली, पुढील उपचारासाठी जे.जे.रूग्णालयात दाखल.


*सचिन वाझे यांची तब्येत बिघडली पुढील उपचारासाठी जे जे रुग्णालयात हलवले*

मुंबई ः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची एन.आय.ए. (N.I.A.) कडून चौकशी करण्यात आली होती. 
अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना एन.आय.ए'.कडून अटक करण्यात आली होती. 
मात्र अटक करण्यात आल्यापासून सचिन वाझे यांची तब्येत खालावलेली आढळून येत होती.
 रात्री सुद्धा सचिन वाझे यांची तब्येत बिघडल्यामुळे एन.आय.ए. (N.I.A.) च्या कार्यालयात डॉक्टरांना बोलावण्यात आले होते.
 मात्र आता सचिन वाझे यांची तब्येत खालावल्याची बातमी समोर येत आहे. 
त्यामुळे वाझे यांना मुंबईच्या 
जे. जे .रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार  दुपारी वाझे यांची प्रकृती खालावल्याचे समजते.
एन.आय.ए. (N.I.A.) च्या कार्यालयात उपचार करणे शक्य नसल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. 
वाझे यांना थकवा जाणवायला लागला होता. 
त्यामुळे वाझे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात गेले होते.
 याठिकाणी त्यांना सलाईन लावण्यात आले होते, 
अशी माहिती सूत्रांनी दिली होती. 
मात्र सचिन वाझे यांच्या चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून एन.अय.ए. ( N.I.A.) कडून त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.

No comments:

Post a Comment