पाच हजार पोलिसांना कोरोना लस....
पुणे : कोरोनाच्या संसर्गात रस्त्यावर उतरून काम करणारे पोलीस कोरोनाबाधित झाले.
राज्यातील ३२९ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला.
कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष आघाडीवर काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले.
पुणे शहर पोलीस दलातील पाच हजार १२९ पोलिसांना कोरोना लस देण्यात आली आहे.
पुणे पोलीस दलात आठ हजार चारशे पोलीस कर्मचारी आहेत.
मंगळवापर्यंत शहर पोलीस दलातील पाच हजार १२९ कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे.
उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण येत्या काही दिवसात पूर्ण होईल.
लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आल्याने कोरोनाच्या संसर्गात काम करणाऱ्या पोलिसांचे मनोबल उंचावले आहे, असे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) स्वप्ना गोरे यांनी VBP NEWS सोबत बोलताना सांगितले.
कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाने प्रत्यक्ष आघाडीवर (फ्रंटलाइन वर्कर) कर्मचाऱ्यांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले.
त्यासाठी शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली.
ही यादी पोलीस महासंचालक कार्यालयात पाठविण्यात आली.
त्यानंतर संबंधित यादी केंद्र शासनाकडे सादर करण्यात आली.
कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी २६ केंद्रे सुरू करण्यात आली.
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील रुग्णालयासह वेगवेगळ्या केंद्रांवर लसीकरण मोहीम पार पडली.
‘ऑनडय़ुटी’ लस शहर पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांनी ऑनडय़ुटी लस घेतली.
पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या केंद्रावर लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
अनेक पोलिसांनी घराजवळ किंवा पोलीस ठाण्यांपासून जवळ असलेल्या केंद्रावर जाऊन लसीकरण केले.


No comments:
Post a Comment