Breaking

Thursday, 4 March 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- पद्मश्री भवरलाल जैन यांच्या पोट्रेटची गिनिज बुकमध्ये नोंद.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- पद्मश्री भवरलाल जैन यांच्या पोट्रेटची गिनिज बुकमध्ये नोंद- याबाबत वृत्त असे की जळगाव येथील जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री भवरलाल जैन यांच्या मोजेक पोट्रेटची गिनिज बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे, जैन पाईप चा उपयोग करून जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी ही प्रतिकृती साकारली आहे मोजेक प्रकारातील या भव्य पोट्रेटची गिनिज बुकमध्ये गिनिज वल्ड रेकाॅर्ड नोंद घेऊन भवरलाल जैन यांच्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र प्रधान केले या कलाकृतीचे नुकतेच लोकार्पण झाले असून ही कलाकृती कायमस्वरूपी जळगावातील जैन व्हॅली परिसरातील भाऊंची सृष्टी येथे कायमस्वरूपी स्थापित करण्यात आली आहे जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी ही दीडशे फूट लांब व 120  फूट रूंद असे सुमारे 18000 चौरस फुटावर मोजेक प्रकारातील ही कलाकृती सलग 98 तासात साकारली आहे यासाठी काळा करडा व पांढरा या रंगाच्या पीई व पीव्हिसी पाईप्सचा उपयोग करण्यात आला आहे भवरलाल जैन यांनी ज्या पाईपच्या माध्यमातून शेती केली आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाया रचला त्यापैकी पाईप्स पासून मोजेक स्वरूपात ही कलाकृती साकार केली आहे, या पोट्रेटसाठी, पीई पाईप 25 मेट्रीक टन म्हणजेच नऊ हजार नग तर पीव्हिसी पाईप पाच मेट्रीक टन म्हणजेच एक हजार नग असे एकूण दहा हजार पाईप वापरण्यात आले आहेत.
गिनिज वल्ड रेकाॅर्डची नोंद करण्यासाठी विशिष्ट प्रोटोकॉल असतो, त्यानुसार ज्या ठिकाणी विक्रम होत असतात अशा मोकळ्या जागेची निवड करण्यापासून तर ते पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ चित्रण करण्यात येते, तसेच अशा प्रकारच्या विक्रमाची नोंद होताना तुकड्या-तुकड्याने प्रत्येक व्हिडिओची बारकाईने नोंद घेण्यात येते अशीच नोंद या पोट्रेट साठी घेण्यात आली या जागतिक विक्रमाच्या नोंदणीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड च्या वतीने स्वप्निल डांगरीकर नाशिक, व निखिल शुक्ल पुणे, या महाराष्ट्रातील प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली होती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी कोरोनामुळे ही पूर्ण कलाकृती ऑनलाइन पाहीली,स्वप्निल डांगरीकर यांनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान केले अशी माहिती जैन इरिगेशन प्रायव्हेट लिमिटेड चेअरमन अशोक जैन यांनी VBP NEWS सोबत बोलताना दिली आहे.

No comments:

Post a Comment