Breaking

Tuesday, 16 March 2021

अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ- गृहमंत्री अनिल देशमुख भाजपच्या रडारवर.


गृहमंत्री महोदय… 
तुम्ही नेमकं केलं काय ?; 
आता अनिल देशमुख भा.ज.पा.च्या ‘रडार’वर....
 
संजय राठोड यांचा राजीनामा आणि सचिन वाझे यांनी निलंबित करण्यात आल्यानंतर अनिल देशमुख भा.ज.पा.च्या रडारवर असल्याचं दिसत आहे. 
हिंगणघाटातील तरुणीचा मृत्यू ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणासह विविध घटनांचा हवाला देत भा.ज.पा.ने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना रोखठोक सवाल केला आहे. 
इतकंच नाही, तर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.
 सचिन वाझे प्रकरण राज्यात गाजत असतानाही गृहमंत्रीही बदलणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. 
मात्र, खाते बदल करण्याच्या सर्व चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावल्या. असं असलं तरी भा.ज.पा.ने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 
भा.ज.पा.ने राज्यात घडलेल्या काही गुन्हेगारी घटनांचा उल्लेख करत अनिल देशमुख यांना सवाल केला आहे. 
त्याचबरोबर राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
 “एका तरुणीला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळले जाते. 
या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. 
घटनेला एक वर्ष पूर्ण झालं, मात्र अजूनही दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही. 
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तिला न्याय कधी मिळणार, हे एकदाचं जाहीर करावं,” असा सवाल भा.ज.पा.ने केला आहे. 
एका तरुणीला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळले जाते, या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. 
घटनेला एक वर्ष पूर्ण झालं, मात्र अजूनही दोषीवर कठोर कारवाई करण्यात आली नाही.
 गृहमंत्री @AnilDeshmukhNCP तिला न्याय कधी मिळणार, हे एकदाचं जाहीर करावं.
 #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/62ghfrb9de — 
भा.ज.पा. महाराष्ट्र (@BJP4Maharashtra)  “महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत निर्दोष साधूंची १०० जणांच्या जमावाकडून निर्घृण हत्या होते, मात्र त्यावर एक शब्दही आपले गृहमंत्री अनिल देशमुख हे काढत नाहीत, कारवाई तर दूरच. मारेकरी अजूनही मोकाट फिरतच आहेत.

No comments:

Post a Comment