परांडा तालुक्यातील श्रीकृष्ण गोशाळा, वडणेर (कपिलापूरी) अध्यक्ष श्री भाऊसाहेब तांबीले यांची अनोखी शक्कल
वडनेर येथील भाऊसाहेब तांबीले यांनी आपल्या चार चाकी गाडीला चक्क गाईच्या शेणाचा लेप दिला आहे. या लेपामुळे गाडीत ए.सी.ची गरजच लागत नसल्याचा दावा ते करीत आहेत
भाऊसाहेब तांबीले, विलास तांबीले, प्रशांत पंडित उपाध्ये (कपिलापूरी) यांची औपचारिक भेट झाली. यावेळी तांबीले यांनी वडणेर (कपिलापूरी) येथील गोशाळेबद्दल माहिती दिली व श्री सन्मती सेवा दल कार्यकर्त्यांनी गोशाळेस समक्ष भेट द्यावी यासाठी आग्रहाचे निमंत्रण दिले. यावेळी गोशाळा माहिती देताना वडणेर येथे गेल्या २० वर्षांपासून गोशाळा चालवत आहेत. तर संस्था रजिस्ट्रेशन सन २०१६ केली आहे. गोशाळेत सध्या ७० लहान, मोठी गाई आहेत. गोशाळा चालवण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत काय आहे यावर चर्चा झाली असता त्यांनी सांगितले की मंदिरा मधील निर्माल्य, समाजातील दान दातार व संस्थाकडून गोरक्षणासाठी चारा, पेंड, गाईंच्या निवारण्यासाठी पत्राचे शेड, पाण्याचे साठवण्यासाठी सेंटेक्स टाकी व इतर उपयोगी मदत वेळोवेळी मिळत आहे. गोशाळेच्या माध्यमातून *कामधेनू घनजिवामृत गोखुर खत* शेतीची पोत सुधारणे व पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
ही गोशाळा कुर्डूवाडी - परांडा - सिध्दक्षेत्र कुंथुलगिरी रोडवर असल्याने अनेक त्यागी (मुनी - माताजी) यांचे विहाराच्या वेळी सानिध्य व आर्शिवाद लाभले आहेत.
या भेटी साठी ते ज्या अनोखी शक्कल लढवून शेणाने सारवलेल्या गाडी बद्दल माहिती देताना सांगितले की उन आणि धूळी पासून ही कार सुरक्षित राहते. शेणामुळे कार थंड राहते. एसीची गरज लागत नाही. देशी गाईचे मानवी आरोग्यास काय महत्व आहे हे कृतीतून दाखवून दिले.
श्री मिहीर बाहुबली गांधी, अकलूज
श्री सन्मती सेवा दल.


No comments:
Post a Comment