महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी/ नुसतं मिरवायचं का?; उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी कोनशिलेच्या नावावरून अधिकार्यांना सुनावलं.......
एखादा प्रकल्पाचे भूमिपूजन किंवा उदघाटनचा कार्यक्रम म्हटलं की मंत्री, स्थानिक आमदार, नगरसेवक यांची नावे कार्यक्रम पत्रिकेत असताना.
तसेच प्रकल्पाच्या कोनशिलेवर देखील अनेक मान्यवरांची नावं असतात.
कधीतरी आपल्या नेत्यांचे नाव नसल्यास काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहण्यास मिळते.
पण पुण्यातील राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास असलेल्या कोनशिलेवर नाव टाकण्यात आलेल्या नेत्यांपैकी अगदी काहीच जण कार्यक्रमास उपस्थित होते.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशाच एका कोनशिलेकडे पाहून अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
जे नेते कार्यक्रमास येणार नव्हते तर त्यांचं नाव काय टाकायचे कारण काय?
असं अजित पवार यांनी प्रत्येक अनुपस्थित नेत्याच्या नावापुढे बोट दाखत अधिकाऱ्याची कानउघाडणी केली.
अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या नाराजीवर अधिकाऱ्यांनाही ‘त्यांचं येणं निश्चित होतं दादा’, असं म्हणत वेळ मारुन नेली.
मात्र अजित पवार यांनी, ‘ते काही नाही.
हे लोकं इथे नाहीत तर उगीच कशाला मिरवायचं नाव,’ असं म्हणत घडलेला प्रकार आवडला नसल्याचं सांगितलं.
राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे अजित पवार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.


No comments:
Post a Comment