महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी/ सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वाच्या आरोपीला अटक......
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
जगतप सिंग आनंद असं या व्यक्तीचं नाव असून ८ फेब्रुवारीपर्यंत त्याला एन.सी.बी. कोठडी सुनावण्यात आली आहे.
आतापर्यंत सुशांतच्या मृत्यूप्रकरणी जवळपास ३० पेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत असताना कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आलं.
याप्रकरणात कलाविश्वातील अनेकांची नाव समोर आली आहेत.
या अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांनादेखील अटक करण्यात आली होती.
त्यानंतर आता जगत सिंग आनंदला अटक करण्यात आली आहे.
जगतप सिंग आनंद हा मुंबईतील ड्रग्स व्यापारी असून तो ड्रग्स पेडलर केजो याचा भाऊ आहे.
दरम्यान, सुशांत सिंहला ड्रग्स पुरवणाऱ्यांच्या यादीत जगत चादेखील समावेश असल्याचं स्पष्ट झालं आहे.
त्यामुळेच त्याला अटक करण्यात आली आहे.
तसंच ड्रग्स पेडलर केजो हा व्यवसायात जे पैसे कमवायचा ते पैसे जगतकडे द्यायचा अशीही माहिती समोर आली आहे.


No comments:
Post a Comment