Breaking

Thursday, 25 February 2021

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी/ सागर लोखंडे- महापौरांच्या स्वतः च्याच कार्यक्रमातच नियमांना तिलांजली.


महापौरांच्या स्वत:च्या कार्यक्रमातच नियमांना तिलांजली.......
 
पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांना तसेच खबरदारी बाळगण्याच्या आवाहनाला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधीनींसह अनेकांनी हरताळ फासण्याचे काम चालवले आहे. 
मेळावे, मोर्चे, आंदोलने, वाढदिवस अशा कार्यक्रमांमुळे सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. 
यात कहर म्हणजे, शहराच्या महापौरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातच सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले आहे.
 वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने सोमवारपासून नव्याने निर्बंध लागू केले आहेत. 
नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे, मुखपट्टीचा(मास्क) वापर करावा आदी शासननियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडूनही करण्यात येत आहे. 
शहर पातळीवर महापौर व आयुक्तांच्या नावाने जनजागृतीचे आवाहन केले जात आहे. 
असे असताना खुद्द महापौर माई ढोरे यांनीच चिंचवडला आयोजित केलेल्या कार्यक्रमात नियमांचे तीन तेरा वाजले. 
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मिसेस पिंपरी-चिंचवड’ या कार्यक्रमाचे महापौरांनी आयोजन केले. 
नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी तुडुंब गर्दी झाली. 
खुर्च्यांवर‘एका आड एक’ याप्रमाणे न बसता सरसकट सर्व खुर्च्यांवर नागरिकांना, महिलांना बसवण्यात आले. 
बहुतेकांनी मुखपट्टी (मास्क) घातलेली नव्हती.
 स्वता महापौर, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविकांचाही त्यात समावेश होता. 
मुखपट्टी (मास्क) न घातलेल्या नगरसेवक व कार्यकर्त्यांन  रॅ ्प वॉक’ची  हौस पूर्ण करून घेतली. 
नाट्यगृहात गर्दी उसळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे आले. 
मात्र, थेट कार्यक्रम बंद पाडण्याचे धाडस त्यांनी दाखवले नाही. 
महापौरांसह नगरसेवकांशी पोलिसांची चर्चा झाल्यानंतर पुढील कार्यक्रम घाईने संपवण्यात आला.

No comments:

Post a Comment