*बैरागवाडी मध्ये मा.आमदार श्री बबनदादा शिंदे व मा.आमदार श्री संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी ग्रामविकास आघाडी ची निर्विवाद सत्ता* .
बैरागवाडी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सर्वसाधारण महिला या सरपंच पदाच्या आरक्षणात सरपंचपदी सौ. जयश्री गणेश सुर्वे यांची व उपसरपंच पदी श्री.दत्तात्रय संभाजी सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यात बैरागवाडी स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व राहिले. या वेळी निवडणूक अधिकारी खळदकर साहेब, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तलाठी वैभव पाटील, ग्रामसेविका घाडगे मॅडम व टेम्भुर्णी पोलीस स्टेशन चे राऊत साहेब यांच्या उपस्थिती मध्ये पार पडली. यावेळी ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन नूतन सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीचे औदुंबर सुर्वे,नागनाथ सुर्वे,नामदेव सुर्वे,माधव सुर्वे,गणेश सुर्वे,हनुमंत सुतार,रावसाहेब सुर्वे,निवृत्ती सुर्वे,दशरथ पाटील,लक्ष्मण पाटोळे,राहुल सुर्वे,अरुण सुर्वे,संतोष सुर्वे.स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:
Post a Comment