पुणे जिल्हा प्रतिनिधी/ विजया प्रभाकर पणशीकर यांचं निधन...
‘नाट्यसंपदा’च्या विजया प्रभाकर पणशीकर यांचं निधन झालं आहे.
त्या ८५ वर्षांच्या होत्या.
वृद्धपकाळाने त्यांचं निधन झालं असून रात्री १.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
विजया पणशीकर यांनी ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी पार पाडली होती.
१९६३ साली नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेची स्थापना करण्यात आली.
या संस्थेने ’अमृत झाले जहराचे’ आणि वसंत कानेटकर यांचे ’मोहिनी’ अशी दोन नाटके रंगमंचावर आणली त्यानंतर ’मला काही सांगायचंय’, ’इथे ओशाळला मृत्यू’, ’कट्यार काळजात घुसली’ अशी अनेक नाटकं गाजली.


No comments:
Post a Comment