Breaking

Thursday, 4 February 2021

मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- डेप्युटी इंजिनिअर च्या आश्वासनानंतर बाबू तात्या सुर्वे यांचे उपोषण मागे.


मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- आश्वासनानंतर तात्यांचे उपोषण मागे-याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील अरण ते पंढरपूर पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात मोडनिंब चे माजी सरपंच  बाबूतात्या सुर्वे  हे रखडलेले रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू व्हावे यासाठी दि,4/2/2021 रोजी मोडनिंब येथील गोल या ठिकाणी उपोषणाला बसले होते, या उपोषणाची दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले व त्यांनी एप्रिल पर्यंत काम पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिल्याने मोडनिंब चे माजी सरपंच बाबू तात्या सुर्वे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य धनराज दादा शिंदे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुका अध्यक्ष कैलास दादा तोडकरी, जि.प.सदस्य भारत आबा शिंदे, डाॅ.संजय लोखंडे, चोपडे साहेब , अशोक भांगे व मोडनिंब ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment