Breaking

Thursday, 4 February 2021

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- सांगली जिल्ह्यातून येणारे भेसळयुक्त 1880 लिटर दूध केले नष्ट...अन्न व औषध प्रशासनाची पंढरपूर येथे कारवाई.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- *सांगली जिल्ह्यातून येणारे भेसळयुक्त 1880 लिटर दूध केले नष्ट*

*अन्न व औषध प्रशासनाची पंढरपूर येथे कारवाई*


सांगली जिल्ह्यातुन पंढरपूरला भेसळयुक्त दूध घेऊन येणाऱ्या व येथील साबारकांथा को- ऑफ मिल्क प्रोड्युसर लिमिटेड या पेढीत वितरित करीत असताना पेढीतील १०० लिटर दुध व टेम्पोतील असे मिळून १८०० लिटर दुध ताब्यात घेत अन्न व औषध प्रशासनाने जागेवर नष्ट केल्याची घटना  घडली आहे. 
या पेढीस दूध व्यवसाय बंद करण्याचे आदेश अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी दिले आहेत.
 याबाबत मिळालेली माहिती अशी की, भेसळ केलेले दूध सांगली जिल्ह्यातून एम. एच .09,सि .यु .0007 या वाहनातून आणले जात होते. 
याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला गुप्त माहिती मिळाली होती. 
त्यानुसार या वाहनावर अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवले. 
त्यानुसार पंढरपूर येथील साबरकांथा को ऑफ मिल्क प्रोड्युसर पेढीत भेसळयुक्त १००लिटर दुध वितरित करताना पकडले व ते १०० लिटर दुध ताब्यात घेऊन त्याचे नमुने व त्या टेम्पोचा पाठलाग करून त्यातील सुमारे १८०० लिटर दुध ताब्यात घेऊन त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशालेत पाठविले आहेत तर १८०० लिटर दुध जागेवर नष्ट करण्यात आले आहे.
याचबरोबर या साबरकांथा को ऑफ मिल्क प्रो. कडे आवश्यक परवाना नसल्याचे तपासणीत दिसून आले आहे .
तसेच भेसळयुक्त दूध आढळून आले आहे तर या दूध पिढीकडे आवश्यक तंत्र ज्ञ नसल्याचे दिसून आल्याने दूध पेढी बंद करण्याचे आदेश अन्न सुरक्षा अधिकारी कुचेकर यांनी दिले आहेत.
या कारवाईमुळे भेसळयुक्त दूध वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

No comments:

Post a Comment