Breaking

Tuesday, 23 February 2021

पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- संगणक परिचालकांच्या शिष्टमंडळासोबत ग्रामविकास मंत्र्यांची मंत्रालयात बैठक घेऊन चर्चा.


*संगणकपरिचालकांच्या शिष्टमंडळासोबत ग्रामविकासमंत्र्यांची मंत्रालयात बैठक घेऊन चर्चा !*

*संगणकपरिचालक आपल्या मागणीवर ठाम;मागणी मान्य होईपर्यन्त आझाद मैदान न सोडणाचा निर्धार!*

*दुसऱ्या दिवशीही हजारो संगणकपरिचालकांची आंदोलनात उपस्थिती!*
               
ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागा अंतर्गत “आपले सरकार” प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून १० वर्ष प्रामाणिक काम केलेल्या संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी नी केलेली असताना शासनाने त्याकडे अनेक वेळा आश्वासन देऊन दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे संगणकपरिचालकांना आय टी महामंडळाकडून कर्मचारी दर्जा व किमान  वेतन देण्याच्या मागणी साठी २२ फेब्रुवारी २०२१ पासून राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतीचे काम करणाऱ्या हजारो  संगणकपरिचालकांचे  आझाद मैदान,मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून त्याची दखल घेत राज्याचे ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांनी  मंत्रालयात  संगणकपरिचालक संघटनेच्या शिष्टमंडळाला बोलवून चर्चा केली परंतु मागण्या  मान्य होई पर्यंत आझाद मैदान न सोडण्याचा निर्धार  राज्यातील संगणकपरिचालकांनी केला असल्याचे संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment