Breaking

Tuesday, 9 February 2021

महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी/ उपाहारगृहे आणी मद्यालये रात्री 1 पर्यंत सुरू, पालिकेची परवानगी.


महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी/ उपाहारगृहे आणि मद्यालये रात्री १ पर्यंत सुरू,
पालिकेची परवानगी......

 मुंबई : मुंबईमधील हॉटेल, रेस्टॉरंट, मद्यालये, फूड कोर्ट सकाळी ७ ते रात्री १ या वेळेत खुली ठेवण्यास मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. 
त्याचबरोबर दुकाने सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत, तर मद्यविक्रीची दुकाने (वाईन शॉप) सकाळी १० ते रात्री १०.३० या काळात सुरू ठेवता येणार आहेत.
 मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी याबाबत  परिपत्रक जारी केले. 
मुंबईतील करोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होऊ लागताच टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला अटीसपेक्ष मर्यादित वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. 
त्यानंतर हॉटेल्सही मर्यादित वेळेसाठी खुली करण्यात आली. 
मर्यादित वेळ आणि ग्राहकांच्या संख्येवर घातलेल्या निर्बंधांमुळे अनेक हॉटेल मालकांनी नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केली होती. 
या निर्बंधांमुळे खर्च आणि उत्पन्नाचा  ताळमेळ बसत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. 
एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारने २९ जानेवारी २०२१ रोजी दुकाने आणि उपाहारगृहांच्या वेळा निश्चित केल्या. 
राज्य सरकारच्या या आदेशांचा आधार घेत इक्बालसिंह चहल यांनी बुधवारी परिपत्रक जारी करून मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट , मद्यालये, फूड कोर्ट सकाळी ७ ते रात्री १ या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. 
त्याचबरोबर सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत दुकाने, तर सकाळी १० ते रात्री १०.३० या काळात मद्यविक्रीची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 
यापूर्वी हॉटेल, रेस्टॉरंट आदी रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी होती. 
परिणामी, आता मुंबई हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याचे चित्र आहे.

No comments:

Post a Comment