Breaking

Sunday, 31 January 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब दरम्यान हाॅटेल ओंकार पॅलेस शेजारी अज्ञात वाहनाकडून अपघातात हरिण जखमी.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब  दरम्यान हाॅटेल ओंकार पॅलेस शेजारी अज्ञात वाहनाकडून अपघातात  हरिण जखमी- याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दि.31/1/2021 रोजी मोडनिंब येथील हाॅटेल ओंकार पॅलेस शेजारी अज्ञात वाहनाकडून अपघातात  हरिण गंभीर जखमी झाले असून त्याची माहिती मिळताच शेटफळ येथील सर्पमित्र प्रविण शेंडगे, बबन पांढरे यांनी वरवडे टोलनाक्यावरील डाॅ. महेंद्र ताकतोडे यांना दिली, लगेचच डाॅ. ताकतोडे व वरवडे टोलनाक्याचे पेट्रोलिंग टीमचे प्रमुख विजय साळुंखे, सागर फाटे, नागनाथ भालेराव, व पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी सज्जन वाघमोडे साहेब यांच्या मदतीने त्या जखमी झालेल्या हरिणास मोडनिंब येथील पशुवैध्यकिय दवाखन्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातात हरिणाचा पाठिमागील पायास गंभीर जखम झालेली आहे व पुढील उपचारासाठी मोहोळ येथे दाखल करण्यात येणार असल्याचे  पशुवैध्यकिय दवाखन्यातील डाॅ. शेंडगे यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment