मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-14-15 डिसेंबरला मुंबईत होणार हिवाळी आधिवेशन!
*मुंबई:* राज्य विधीमंडळाचे हिवाळी आधिवेशन येत्या 14 आणि 15 डिसेंबरला होणार आहे. कोरोनाची परिस्थीती लक्षात घेता हे आधिवेशन दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधान भवनात यासंदर्भात बैठक होती.
या दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनात श्रद्धांजली कार्यक्रम, शोकप्रस्ताव आणि पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. तसेच हिवाळी अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून सर्वांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय विधानमंडळाने घेतला आहे.


No comments:
Post a Comment