Breaking

Friday, 27 November 2020

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- व्होळे ( खु ) येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- व्होळे ( खु ) येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन- याबाबत सविस्तर वृत्त असे की माढा तालुक्यातील व्होळे ( खु ) येथे दिनांक 28 नोव्हेंबर वार शनिवार पासून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, सालाबाद प्रमाणे सलग चौथ्या वर्षी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन बावी गावचे सरपंच मा. मुन्नाराजे मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्होळे येथील गोटू दादा कासवेद मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. 

या स्पर्धेसाठी
प्रथम पारितोषिक रू 7010 मा. योगेश पाटील (ता. अध्यक्ष भा.यु.मो.माढा) 
सतिश क्षीरसागर (सरपंच ग्रा.प व्होळे) यांच्याकडून 
व 
द्वितीय पारितोषिक रू 5010मा. विनोद शेट चोपडे (व्होळे)
त्रुतिय पारितोषिक रू 3010 मा.अक्षय भाऊ ढवळे (सदस्य ग्रा.प सापटणे) व ज्ञानदेव बप्पा चोपडे यांच्या कडून..
चतुर्थ पारितोषिक रू 2010 हे अजिंक्य मोरे (बावी) यांच्याकडून  देण्यात आली.. .
व इतर ही वैयक्तिक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.


इच्छुक संघांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक गोटू दादा कासवेद यांनी केले आहे. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून शनिवार दि.28 नोव्हेंबर पासून हि क्रिकेट स्पर्धा व्होळे येथे सुरू होणार आहे. ही स्पर्धा टेनिस बाॅलवर खेळवण्यात येणार आहे तसेच या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संघाला 510 रूपये प्रवेश फी आकरण्यात येईल व व्होळे गावचे ग्रामदैवत हनुमान जयंती निमित्त या स्पर्धा खेळवल्या जाणार असून हाफ-पीच वरती या स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत अशी माहिती आयोजक गोटू दादा कासवेद यांनी VBP NEWS सोबत बोलताना दिली आहे.

No comments:

Post a Comment