Breaking

Friday, 27 November 2020

मुंबई शहर प्रतिनिधी/ विशाल खडके- अर्जेंटिनाचे महान फुटबाॅलर दिएगो मॅराडोना यांचं निधन.


मुंबई शहर प्रतिनिधी/ विशाल खडके-अर्जेंटिनाचे महान फुटबॉलर दिएगो मॅराडोना यांचं निधन झालं आहे. ते 60 वर्षांचे होते.






मेंदूतील रक्तस्रावामुळे मॅराडोना यांना काही दिवसांपूर्वी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयरिसमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मॅराडोना यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांची तब्येत सुधारत होती. मद्यसेवनाची सवय सुटावी यासाठी त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं आहे. 







फुटबॉलच्या मैदानात मॅराडोना यांची कारकीर्द जितकी शानदार ठरली, तितकीच वादळी आणि वादग्रस्तही ठरली.  







मॅराडोना यांनी एकूण 491 मॅचमध्ये 259 गोल केले. तर अर्जेंटिनासाठी 91 सामन्यांत 34 गोल केले होते. त्यांनी चार विश्वचषक स्पर्धांत आपल्या देशाचं नेतृत्त्व केलं होतं. 1986 विश्वचषक जिंकणाऱ्या अर्जेंटिनाच्या संघाचे ते कर्णधार होते.

No comments:

Post a Comment