Breaking

Saturday, 28 November 2020

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- माढा शहरामध्ये भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा प्रचार दौरा.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे-माढा शहरामध्ये भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा प्रचार दौरा- याबाबत सविस्तर वृत्त असे की पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी माढा शहराचा प्रचार दौरा केला. 





यावेळी त्यांनी माढा येथे मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या. तसेच त्यांच्या उपस्थितीत माढा शहरात मतदारांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी त्यांच्या सोबत भारतीय जनता पार्टी चे युवा मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष राहूल महाडिक, प्रदेश सदस्य अविनाशजी,शरद उकवले, भाजपचे युवा मोर्चा चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अमोल कुलकर्णी, सरचिटणीस अजय जाधव, युवक तालुकाध्यक्ष योगेश पाटील, भाजपचे जेष्ठ नेते नागनाथ कदम, सुनिल वाळके,संध्या कुंभेजकर, तसेच तालुक्यातील इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या प्रचार दौर्याचे नियोजन भाजपचे सरचिटणीस मदन मुंगळे व भाजपचे माजी शहराध्यक्ष विजयकुमार महासागर यांनी केले होते.

No comments:

Post a Comment