सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- माळशिरस तालुक्यात पिलिव येथे काळामळा येथे चार लाखाचा गांजा जप्त- याबाबतसातारा पोलिस पथकाची कारवाई ,
माळशिरस तालुक्यातील पिलिव येथील काळामळा येथे चार लाखाचा गांजा पकडला असून याबाबतचा गुन्हा माळशिरस पोलिसांत दाखल झाला आहे. सदरची कारवाई सातारा पोलिसांनी केली असून याबाबतची समजलेली सविस्तर माहिती अशी की सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वडूज येथे एक महिला गांजा विक्रीचा व्यवसाय करीत होती याची कुणकुण वडूज पोलिसांना लागली त्यांनी सदर महिलेला गांजा विकताना रंगेहाथ पकडले त्यानंतर त्या महिलेकडे चौकशी केली असता त्या महिलेने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पिलिव येथील काळा मळा येथील एक व्यक्ती कडून गांजा विकत घेत असल्याचे सांगितले.त्यानंतर सातारा पोलिसांचे एक पथक पिलिव भागात दाखल झाले त्यानंतर सातारा पोलिसांनी कसून चौकशी करून पिलिव येथील काळा मळा येथील सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे चार लाख रूपयांचा गांजा जप्त करण्यात आला .


No comments:
Post a Comment