Breaking

Saturday, 28 November 2020

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- आ.भारत भालके यांचे निधन, जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार-आमदार भारत नाना भालके यांचे निधन, जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर- याबाबत सविस्तर वृत्त असे की पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार भारत नाना भालके यांचे निधन झाले आहे, ते 60 वर्षांचे होते, पुण्यातील रूबी रूग्णालयात त्यांनी उपचारा दरम्यान अखेरचा श्वास घेतला. 






आ.भारत भालके यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती, काही दिवसांपूर्वीच ते कोरोना वर मात करून घरी परतले होते, मात्र पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा पुण्यातील रूबी रूग्णालयात दाखल करण्यात आले, शुक्रवारी दुपारपासून त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते अखेर मध्यरात्री उशीरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला सकाळी पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुकाच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

No comments:

Post a Comment