Breaking

Saturday, 28 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- आ.भारत नाना भालके यांचे निधन.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- आ.भारत नाना भालके यांचे निधन- *माझेच नव्हे तर तालुक्यातील गोरगरीब मुलांना प्रत्येक दिवाळीला गोडधोड देणारा मामा (आमदार भारतनाना भालके) यांचे दुःखद निधन झाले...........*       *प्रत्येक गोर-गरिबांच्या मनावर अधिराज्य करणारा राजा माणूस हरपला....*       मंगळवेढा तालुक्यातील 35 गावचा महत्वाच्या पाणी प्रश्नासाठी शर्तीचे प्रयत्न केले .जोपर्यंत प्रश्न सोडवणार आहे तोपर्यंत मी डोक्याला भेटा बांधणार नाही .असा पण त्यांनी केला होता. अजूनही काही भाग पाण्याविना राहिल्यामुळे 3  टर्म आमदार होउनही त्यांनी डोक्याला फेटा बांधला नाही. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात फेटा  बांधून मिरऊ वाटते परंतु माझा राजा मानाचा फेटा न घेताच आपणास राम राम करून निघून गेला. आज फार वाईट वाटते. विरोधकांनाही हवा हवासा वाटणारा नेता.... गरिबांचे झोपडी जळालेली असो अथवा गरिबांचे चूल विझलेली असो...... अशा समयी नाना सदैव त्यांच्यासोबत असणारा हा आमदार ..... प्रत्येकाला कोणतीही अडचण येवो. ते  प्रत्येकाला ते एक आधारस्तंभ होते..... ट्राफिक वाल्याने गाडी अडवल्या पासून ते गरिबांच्या कार्यक्रमात गाडी मिळत नसल्यास नानांना फोन लावले जायचे... व कोणतीही समस्या सुटायची.मग ती  युरिया मिळण्यापासून असो अथवा शेतातील डीपी जळलेला मिळण्याबाबत असो. अथवा एखादा अधिकाऱ्याचा कामचुकारपणा असो. एखाद्या गरीब मुलांचे पहिलीच्या ऍडमिशन  पासून ते डॉक्टरकीच्या ऍडमिशन पर्यंत गरजूला खात्रीने मदत करणारा एकमेव आमदार होऊन गेला. आमदार भरपूर होतील पण असा आमदार होणार नाही.............. *अशा राजा माणसाला अश्रूपूर्ण श्रद्धांजली....*.

No comments:

Post a Comment